माकॅसर
माकॅसर : (ऊजुंग पांडांग). इंडोनेशियातील प्रमुख नैसर्गिक सागरी बंदर, तसेच सेलेबीझ बेटावरील सर्वांत मोठे शहर आणि सुलावेसी सलाटन प्रांताची राजधानी. लोकसंख्या ७,०९,००० (१९८०). सेलेबीझ बेटाच्या अगदी नैर्ऋत्य टोकावर, बोर्निओ व सेलेबीझ या बेटांना अलग करणाऱ्या माकॅसर सामुद्रधुनीच्या आग्नेय टोकाशी हे शहर वसले आहे.